शिष्यवृत्तीधारक 31 विद्यार्थ्यांचा सन्मान

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील महाळुंगे पडवळ येथे हुतात्मा बाबू गेणू विद्यालय व श्री वि. ग. कापुसकर कनिष्ठ महाविद्यालयातील शिष्यवृत्ती परिक्षेत यशस्वी झालेल्या इयत्ता 5वी व 8वी च्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेच्या पश्‍चिम विभागाचे विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, पंचायत समिती खेडचे शिक्षणविस्तार अधिकारी जीवन कोकणे, सुधाकर पडवळ, सरपंच तुकाराम आवटे, किसन आवटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात इयत्ता 5वी व 8 वीतील 31 शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपशिक्षक गोरक्ष केदारी यांनी तयार केलेल्या विद्यालयाच्या ब्लॉकचे उद्‌घाटन किसन रत्नपारखी व जीवन कोकणे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य लक्ष्मण काटेकर यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्‍वर निमोणकर, पंकज गोसावी यांनी केले तर पर्यवेक्षक संतोष निऱ्हाळी यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)