शिष्यवृती अर्जास मुदतवाढ दिल्याने विद्यार्थांना दिलासा

– आता अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी
– शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची जबाबदारी शाळांची
 
पुणे – उच्च शिक्षण विभागाने महाडीबीटी पोर्टलवरून विविध शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत ही 31 जानेवारीपर्यंत वाढविलेली आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत 31 डिसेंबर रोजी संपली होती. आता मुदतवाढ देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

उच्च शिक्षण विभागाच्या विविध शिष्यवृत्ती योजनेसाठी एकत्रित संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. महाडीबीटी या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना अर्ज करावयाचे आहे. त्यासाठी दि. 31 डिसेंबरपर्यंत मुदत होती. मात्र, अजूनही निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय उच्च शिक्षण विभागाने घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, दक्षिणा शिष्यवृत्ती, राज्य शासनाची खुली शिष्यवृत्ती, संशोधन अधिछात्रवृती अशा अनेक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज विद्यार्थ्यांकडून मागविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आल्याने महाडीबीटी पोर्टलवरून वेळेत अर्ज सादर करावे, असे आवाहन उच्च शिक्षण विभागाने केले आहे.

यासंबंधीचे परिपत्रक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व संलग्नित महाविद्यालयांना पाठविले आहे. त्यानुसार महाविद्यालयांनी कार्यवाही करावी. विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून घ्यावयाची जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थेची राहील, असेही उच्च शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)