शिशुपोषण अॅप…

आई होणे म्हणजे प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदी क्षण’! गर्भवती महिला असो किंवा नवजात शिशूची आई, प्रत्येकीला आपल्या बाळाचे आरोग्य सुदृढ व चांगले असावे, अशी इच्छा असणे स्वाभाविक आहे. गर्भवती महिला व स्तनदा मातांसाठी तज्ज्ञ डॉक्‍टर्स व संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी शास्त्रशुद्ध माहिती देणारे एक बहुपयोगी अॅण्ड्रॉईड अॅप तयार केले आहे.

मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालय व सेठ गो. सुं. वैद्यकीय महाविद्यालयाच्या पुढाकाराने तसेच युनिसेफ (युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड), ब्रेस्टफीडिंग प्रमोशन्स नेटवर्क ऑफ इंडिया आणि मुंबई ब्रेस्टफीडिंग प्रमोशन कमिटी यांच्या सहकार्याने गर्भवती आणि स्तनदा माता यांना अतिशय उपयोगी ठरेल असे शिशुपोषण’ (ShishuPoshan) हे अॅण्ड्रॉईड अॅप तयार करण्यात आले आहे. आईच्या दुधात बाळाच्या वाढीसाठी आवश्‍यक असणारी सर्व पोषकतत्त्वे सुयोग्य प्रमाणात असतात. त्यामुळे बाळ जन्मल्यापासून ते सहा महिन्यांचे होईपर्यंत निव्वळ स्तनपान देण्याची गरज असते. तसेच पाणी देण्याची आवश्‍यकता नसते. आईचे दूध योग्य प्रमाणात मिळाल्यास ते मूल अधिक निरोगी व हुशार होते. या बाबी लक्षात घेऊन शिशुपोषण’ हे माहितीपूर्ण अॅप तयार करण्यात आले आहे.

बाळाला स्तनपान कसे द्यावे? ते देताना कोणती काळजी घ्यावी? स्तनपानाच्या दृष्टीने कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? स्तनपानाने मुलांच्या आरोग्याला कसा व कोणता उपयोग होतो? तसेच कामकाजी महिलांनी स्तनपान कसे सुरू ठेवावे? यासारख्या अनेक प्रश्‍नांची उत्तरे साध्या-सोप्या भाषेत या अॅपवर उपलब्ध आहेत.

बाळाची सुयोग्य व निकोप वाढ होण्यासाठी सर्वसाधारण काळजी काय घ्यावी? मातेचा आहार कसा असावा? पूरक आहार आणि पोषण म्हणजे काय? यासारख्या आई व बाळाशी संबंधित असणा-या विविध बाबींवर शास्त्रशुद्ध माहिती या अॅपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. ShishuPoshan हे अॅण्ड्रॉईड अॅप गुगल प्लेस्टोअरवर मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. गुगल प्लेस्टोअरवर ShishuPoshan या नावाने सर्च करून हे अॅप आपल्या अॅण्ड्रॉईड स्मार्ट फोनवर सहजपणे डाऊनलोड व इन्स्टॉल करता येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)