शिव व्यापारी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी रामनारायण अग्रवाल

श्रीरामूपर – शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेनेच्या नगर जिल्हाध्यक्षपदी येथील सुपर गॅस या दुकानाचे चालक रामनारायण बन्सीलाल अग्रवाल यांची नियुक्‍ती झाली आहे. व्यापारी सेनेचे संस्थापक अध्यक्ष चिंटू शेख (मुंबई) यांनी या नियुक्‍तीचे पत्र दिले असून एक वर्षासाठी ही नियुक्‍ती आहे.

शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिव व्यापारी ही राज्यव्यापी संघटना आहे. व्यापाऱ्यांना खंबीर नेतृत्वाची गरज व विश्‍वासहर्ता जपणे व जनतेला अभिप्रेत असणारी व्यापारी शिवव्यापारी सेनेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना संघटीत करण्याचे काम संघटनेने हाती घेतले आहे. जिल्ह्यात संघटनेच्या ध्येयधोरणाची व्यापाऱ्यांना माहिती देवून त्यांना संघटीत करून त्यांच्या हिताचे कार्यक्रम राबविण्यासाठी कार्य करावे. शिवव्यापारी सेनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांकडून समाजाला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे पत्रात नमूद केले आहे.

-Ads-

नगर जिल्हा शिवव्यापारी सेनेची कार्यकारीणी करण्यासाठी जिल्हा दौरा करून तालुका व शहर पातळीवर शाखा स्थापन करण्यात येतील. व्यापाऱ्यांना संघटीत करुन त्यांच्यावरील अन्याय, दुकानदाराच्या चोऱ्यांचे तपास व शासनाच्या कायद्याअंतर्गत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी संघटीतपणे काम करणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)