शिव व्यापारी सेनेची निदर्शने

पिंपरी – भाटनगर परिसरात दुर्गंधीचे वाढते साम्राज्य आहे. तर रहाटणी-काळेवाडी परिसरात होत असलेला अनियमित पाणी पुरवठा या विरोधात शिव व्यापारी सेनेच्या शहर शाखेच्या वतीने मोरवाडी चौकात बुधवारी (दि. 31) निदर्शने करण्यात आली.

याबाबत महापालिका सहाय्यक आयुक्त प्रवीण अष्टीकर यांना निवेदन देण्यात आले असून, येत्या पंधरा दिवसांत या समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, रहाटणी, काळेवाडी परिसरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच भाटनगर परिसरात नियमित स्वच्छता राखण्यात महापालिका प्रशासन कमी पडत आहे. यामुळे रोगराई पसरण्याची शक्‍यता आहे. पेट्रोल आणि डिझेलवर विविध प्रकारचे कर लावून त्यांच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ करण्यात येत आहे. पेट्रोल दरवाढीचा आलेख दररोज वाढत आहे. याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. येत्या 15 दिवसात सर्व प्रश्न सोडवावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

-Ads-

या आंदोलनात शिवसेना विभाग प्रमुख खंडु शिरसाठ, लहु तिकोने, शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेना शहर प्रमुख युवराज दाखले, उपशहर प्रमुख गणेश आहेर, गणेश पाडुळे, गोरख पाटील, चिंचवड विधानसभा प्रमुख निलेश भोरे, बाळासाहेब गायकवाड, नाना गायकवाड, दत्ता गिरी, रोहीदास तांबे, दीपक कांबळे, माऊली जाधव, भोसरी विधानसभा प्रमुख भरत इंगळे, पिलाभाऊ बनसोडे, नितीन गायकवाड, अजय कांबळे, अरूण गायकवाड, तुकाराम शिंदे, अक्षय थोरात, सोनु शिरसाठ, पुणे जिल्हा महिला संघटीका अनुजा कुमार शिंदे, शहर संघटीका भाग्यश्री मस्के, सारिका तामचीकर, सिमा रावळकर, अनुसया तामचीकर, सोनी भाट, गिता माछरे, ममता माछरे, मंदाकिनी मोरे, मनिषा मगर, लक्ष्मी कांबळे आदी सहभागी झाले होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)