शिवीगाळ करत विवाहितेचा विनयभंग

पिंपरी – दमदाटी करत व शिवीगाळ करत 23 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मयुर लक्ष्मण जाधव, महेश लक्ष्मण जाधव (दोघे रा. आळंदी रोड, भोसरी) यांच्या विरोधात पीडितेने तक्रार दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता मयूर व महेश यांच्या आईसोबत बोलत उभी असताना ते दोघे तेथे आले. त्यांनी पीडितेच्या कानाखाली देत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच यावेळी तुझा नवरा येथे काम कसे करतो तेच बघतो म्हणत पोलिसांत तक्रार दिली तर पाहून घेतो अशी धमकी दिली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)