शिवार चौकात “नो पार्किंग’

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपळे गुरव येथील शिवार चौकात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सांगवी वाहतूक शाखेकडून शिवार चौक ते सनशाईन व्हिला या रस्त्याच्या दुतर्फा सर्व वाहनांसाठी “नो पार्किंग झोन’ करण्यात आला आहे. हा बदल प्रायोगिक तत्त्वावर केला आहे. या बदलाविषयी नागरिकांच्या हरकती अथवा सूचना असल्यास दि. 25 ऑगस्टपर्यंत लेखी स्वरूपात सादर करु शकतात. या सूचना पोलीस उपायुक्‍त, वाहतूक नियंत्रण शाखा, साधु वासवानी रोड, पुणे येथे नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)