शिवापुरातील शिबीरात झाली शिधापत्रिकेची कामे

खेड शिवापूर-शिवापूर (ता. हवेली) येथे अन्नधान्य वितरण कार्यालय पुणे शहर अंतर्गत परिमंडल कार्यालय महसूल विभाग यांच्या वतीने आयोजित शिबिरात शिवगंगा खोऱ्यातील 70 जणांनी लाभ घेतला.
हे शिबीर येथील अलंकार कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात नवीन, दुबार, (गहाळ/खराब) शिधापत्रिकांचे अर्ज स्वीकारुन नवीन शिधापत्रिका देण्यात आल्या. तसेच शिधपत्रिकेतील नावे कमी करणे, वाढविणे, दुरुस्ती करून शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. या शिबिरात खोऱ्यातील 70 जणांनी लाभ घेतला. या शिबिरासाठी परिमंडल अधिकारी महसूल विभाग गीतांजली गरड, खेड शिवापूर मंडल अधिकारी शेखर शिंदे, पुरवठा निरीक्षक राजेंद्र चिपूरे, श्री. पायगुडे, वानखे, भंडारी, सहायक परिमंडल अधिकारी जगताप, लिपिक गणेश झोगे, गावकामगार तलाठी सी. पी. तांबोळी, तुषार मोरे, पांडुरंग चव्हाण, पप्पू कुंभार यांनी परिश्रम घेतले. यावेळी सरपंच जयश्री दिधे, पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध यादव, दिपक रजपूत, दादा नवघणे, शरद गुजर, अक्षय कोंडे आदि मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)