शिवाजी विद्यापीठावर प्राध्यापकांचा मोर्चा

कोल्हापूर- विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनाच्या 14 व्या दिवशी सोमवारी कोल्हापुरात प्राध्यापकांनी राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली. तसेच या आंदोलनाअंतर्गत मंगळवारी सकाळी 11 वाजता “सुटा’च्यावतीने शिवाजी विद्यापीठावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील सर्व नियमित, तासिका तत्त्वावरील प्राध्यापक सहभागी होणार आहेत. राजारामपुरीतील जनता बझारपासून मोर्चाला सुरुवात होईल.

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर निदर्शने करून कुलगुरूंना निवेदन दिले जाणार आहे. बेमुदत कामबंद आंदोलनामुळे होत असलेले नुकसान सातत्याने सरकारला कळवावे. आंदोलनाबाबत मार्ग काढण्यासाठी सरकारला प्रवृत्त करावे, या मागण्या निवेदनाद्वारे केले जाणार असल्याची माहिती सुटाचे सहकार्यवाह डॉ. अरुण शिंदे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)