शिवाजी विद्यापिठावर प्राध्यापकांचा धडक मोर्चा

कोल्हापूर: आपल्या विविध मागण्यांसाठी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील प्राध्यापकांनी सुटाच्या नेतृत्वाखाली आज विद्यापीठावर धडक मोर्चा काढला. यावेळी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू असल्याने विद्यापीठाच्या पहिल्या सत्रातील परीक्षा 15 दिवस पुढे ढकला, अशी मागणी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) मंगळवारी केली.

महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन्स (एम्फुक्‍टो) आणि शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) नेतृत्वाखाली कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील प्राध्यापकांनी गेल्या 13 दिवसांपूर्वी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन्सच्या (एम्फुक्‍टो) नेतृत्वाखाली राज्यभरातील प्राध्यापकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

मात्र, मुख्यमंत्री आणि उच्चशिक्षणमंत्री अद्यापही आंदोलनाबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करीत नसल्याचा निषेध करीत मंगळवारी सुटाच्या नेतृत्वाखाली प्राध्यापकांनी शिवाजी विद्यापीठावर मोर्चा काढला. सकाळी साडेअकरा वाजता राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृहापासून मोर्चाला सुरूवात झाली. विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन, डोक्‍यावर गांधी टोपी परिधान करून प्राध्यापक या मोर्चात सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)