शिवाजी पार्क मैदानावर आवाज बंद ; स्पिकरला परवानगी नाही

हस्तक्षपास हायकोर्टाचा नकार ः स्वातंत्रदीन स्पिकरला परवानगी नाही

मुंबई – सायलेन्स झोन (शांतता क्षेत्र) म्हणून घोषीत केलेल्या परिसरात लाऊडस्पिकर लावण्यास उच्च न्यायालयाने आज मनाई केली आहे. त्यामुळे स्वातंत्रदिनानिमित्त दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर राष्ट्रभक्ती समितीने आयोजित केलेल्या कायक्रमास लाऊड स्पिकरला परवानगी देण्यास उच्च न्यायालयाने असमर्थता दर्शविली.

उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशात आपण हस्तक्षेप करणार नाही, असे न्यायमूर्ती भुषण गवई आणि न्यायमूर्ती एम. एस.कर्णिक यांच्या खंडपीठाने नकार दिला. या संदर्भातील याचिका न्यायालयात प्रलंबित असल्याने त्याच खंडपीठाकडे दाद मागा, असे निर्देश देऊन याचिकाकर्त्यांना याचिकामागे घेण्यास परवानगी दिली. यामुळे स्वातंत्रदिनी मैदानावर स्पिकरचा आवाज बंदच राहण्याची शक्‍यता आहे.

राष्ट्रभक्ती समितीने युवकांमध्ये देशभक्ती जागृत व्हावी म्हणून कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात लाऊड स्पिकरच्या वापरण्यास करण्यास परवानगी मिळावी म्हणून दादर पोलीसांकडे अर्ज केला होता. हा परीसर शांतता क्षेत्रात येत असल्याने पोलीसांनी परवानगी नाकारल्याने सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्यावतीने ऍड. रधुराज देशपांडे यांनी उच्च न्यायालयात यायिका दाखल केली होती. गेल्यावर्षी राष्ट्रभक्ती समितीने स्वातंत्रदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी लाऊड स्पिकर लावल्यामुळे समितीला 9 हजार रूपयाचा दंड भरावा लागला होता. म्हणून समितीने यावर्षी पोलीसांकडे परवानगी मागितली होती.

याचिका मागे घेण्याची परवानगी
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने गेल्या वर्षी ध्वनी प्रदुषणा संदर्भातील याचिकांवर निर्णय देताना शांतता क्षेत्रात लाऊड स्पिकर लावण्यास मनाई केली आहे. ही याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

या खंडपीठाने हा आदेश दिल्याने त्यात हस्तक्षेप करण्यास न्यायमूर्ती भुषण गवई आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने नकार दिला. याबाबत संबंधीत खंडपीठाकडे दाद मागण्यासाठी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना याचिका मागे घेण्याची परवानगी दिली. याचिकाकर्त्यांना संबंधीत खंडपीठाकडे तातडीने दाद मागणे अशक्‍य असल्याने या न्यायालयाच्या मनाई आदेशावरच नव्याने याचिका केली जाईल, असे ऍड. रधुराज देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्वातंत्रदिनी मैदानावर लाऊड स्पिकर वाजणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)