शिवाजी करंडक क्रिकेट स्पर्धा; एमआयटी कोथरूडचा सिंहगड इन्स्टिट्यूटवर विजय

पुणे- मधुर काहुनगो, खालिद कुरेशी आणि नीरज कुमार यांची दमदार फलंदाजी आणि अभिषेक मुथा व यश मुनी यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर एमआयटी कोथरूड संघाने सिंहगड इन्स्टिट्यूट लोणावळा संघावर 43 धावांनी मात करताना एआयएसएसएमएस आयोजित शिवाजी करंडक राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या एमआयटी कोथरूड संघाने 17 षटकांत 6 बाद 151 धावा फटकावल्या. मधुर काहुनगोने 51, तसेच खालिद कुरेशी आणि नीरज कुमार यांनी प्रत्येकी 32 धावा फटकावून एमआयटीच्या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला. सिंहगडकडून संकेत साबळे व शुभम गायकवाड यांनी 2-2 बळी घेतले.

विजयासाठी 152 धावांच्या आव्हानासमोर सिंहगडचा डाव 16.4 षटकांत 108 धावांवर संपुष्टात आला. हर्षा धामणकरने सर्वाधिक 22 धावा केल्या. तर संकेत साबळेने 17 व सौरभ वाघने 15 धावा करीत त्याला साथ दिली. अभिषेक मुथाने 18 धावांत 4 आणि यश मुनीने 20 धावांत 2 बळी घेत एमआयटीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अभिषेक मुथा सामनावीर ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)