शिवाजी इंग्लिश स्कूलचा स्नेहसंमेलन उत्साहात

सासवड- येथील शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकतेच वार्षिक स्नेह संमेलन साजरे करण्यात आले. यावेळी चिमुकल्यांनी विविध कलाविष्कार सादर केल्या. तसेच द्वितीय सत्रात कलाविष्कारांच्या माध्यमातून खालावत चाललेली भूजल पातळी व त्यामुळे निर्माण होत असलेल्या भीषण समस्या व त्यावरील उपाययोजना याचा अंतर्भाव नृत्यातून सादर केला. कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रा. किरण रणदिवे, विद्यालयाच्या प्राचार्य रेणुका सिंग, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव डी. एन. गवळी, शाळेचे जनसंपर्क अधिकारी अमोल सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केल्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा आनंदी जगताप, सचिव संजय जगताप, सहसचिव डी. एन. गवळी यांनी विद्यालयाच्या प्राचार्य व सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)