“शिवाजी इंग्लिश’मध्ये रंगले अवकाश निरीक्षण

सासवड- विद्यार्थ्यांना नेहमीच आकाशातील चंद्र, तारे, ग्रह याविषयी कुतुहूल असते आणि म्हणूनच त्यांना अवकाशातील वेगवेगळ्या राशी, ध्रुव तारा, अगस्त तारा , सेच नक्षत्र व उपग्रहांविषयी अधिक माहिती मिळावी आणि त्यांचे निरीक्षण करता यावे, यासाठी “आयुका’ संस्थेच्या मदतीने सासवड (ता. पुरंदर) येथील शिवाजी इंग्लिश मीडियम स्कुलच्या मैदानात अवकाश निरीक्षण कार्यक्रम अयोजित करण्यात आला होता. शाळेचा एक टेलिस्कोप आणि आयुका संस्थेचे तीन टेलिस्कोप यांच्या साहाय्याने अवकाश निरिक्षण करण्यात आले. “आयुका’तर्फे आलेले तुषार पुरोहित आणि बाबर अली मीर यांनी विद्यार्थ्यांना अवकाश दर्शनाबद्दल मार्गदर्शन केले. विद्यालयाच्या विज्ञान विभागाच्या प्रमुख उज्ज्वला जगताप यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी शाळेच्या प्राचार्या रेणुका सिंग मर्चंट, उपप्राचार्या सुषमा रासकर आणि इतर स्टाफ उपस्थित होते, असे शाळेचे जनसंपर्क अधिकारी अमोल सावंत यांनी सांगितले.

What is your reaction?
2 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)