शिवाजीनगर बस स्थानकांचे मुळा रोडला स्थलांतर

महामेट्रोच्या कामामुळे दोन वर्षे स्थानक शहराबाहेर

पुणे – शिवाजीनगर बसस्थानकाच्या जागेवर महामेट्रोकडून मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेले बसस्थानक मुळा रोड येथील कृषी महाविद्यालयाच्या साडेतीन हेक्‍टर जागेवर स्थलांरित करण्यास एस. टी महामंडळाने परवानगी दिली असल्याची माहिती महामेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे कार्यकारी संचालक प्रमोद अहुजा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. हे स्थानक जानेवारीच्या 2019 च्या आठवडयात मुळा रोड येथून सुरू होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महामेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गावर रेंजहिल्स ते स्वारगेट हा भुयारी मार्ग असणार आहे. त्यात शिवाजीनगर हे पहिले भुयारी स्थानक आहे. मात्र, या ठिकाणी एस. टी, पीएमटी तसेच रेल्वेचेही स्थानक असल्याने या ठिकाणी असलेल्या एसटी महामंडळाच्या जागेवर महामेट्रोकडून मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट हब उभारला जाणार आहे. त्यासाठी महामेट्रोकडून महापालिकेच्या मदतीने स्थानकाच्या आसपासची अतिक्रमणे काढून घेऊन सर्व जागेला बॅरीगेटस केले आहे. तसेच याठिकाणी असलेल्या सेवा वाहिन्यांची तपासणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे शिवाजीनगर एसटी स्थानक इतरत्र शिफ्ट करणे आवश्‍यक होते. त्यासाठी महामेट्रोकडून जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरील मुळा रोडच्या बाजूला असलेली जागा तसेच आरे डेअरीच्या बाजूला असलेल्या जागांचा पर्याय देण्यात आला होता. मात्र, मुळा रोडची जागा रस्त्याच्या बाजूला असल्याने एसटी महामंडळाने त्यास प्राधान्य देत शिवाजीनगर स्थानक मल्टीमॉडेल हबचे काम पूर्ण होईपर्यंत मुळा रोड येथे स्थलांतरित करण्यास होकार दिला आहे.

स्थानकाचे काम पुढील आठवड्यात सुरू
मुळा रोड येथे असलेल्या या स्थानकाची जागा सुमारे साडेतीन हेक्‍टर असून या ठिकाणी एसटी तसेच प्रवाशांना आवश्‍यक असलेल्या सुविधा महामेट्रोकडून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी एसटीकडून सूचना मागविण्यात आल्या असून हे काम पुढील आठवडयात सुरू केले जाणार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत शिवाजीनगर येथूनच एसटीचे संचलन होणार आहे. जानेवारी 2019 च्या दुसऱ्या आठवड्यापासून हे स्थानक स्थलांतर करणे अपेक्षित असल्याचे अहुजा यांनी स्पष्ट केले.

स्वारगेट पीएमपी स्थानकही शिफ्ट करणार
दरम्यान, स्वारगेट येथील भुयारी स्टेशनचे काम महामेट्रोकडून सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी स्वारगेट येथील छत्रपती शाहू महाराज बसस्थानक त्या ठिकाणीच आतील बाजूस असलेल्या स्वारगेट पाणीपुरवठा केंद्राच्या जागेत हलविण्यात येणार आहे. त्यासाठी या स्थानकाच्या समोरील बाजूस असलेल्या महापालिकेने मान्यता दिलेल्या सुमारे 61 हून अधिक पथारी लक्ष्मीनारायण थिएटरच्या बाजूला स्थलांतरीत केली जाणार असून दिवाळीनंतर ही जागा रिकामी केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)