शिवाजीनगर बसस्थानकाचे स्थलांतरण 3 वर्षांसाठी

शासनादेश जारी : प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना

पुणे – महामेट्रोसाठी शिवाजीनगर येथील एसटी स्थानकाच्या जागेची आवश्‍यकता असल्याने एसटी स्थानक व प्रशासकीय कार्यालय तात्पुरत्या स्वरुपात वाकडेवाडी येथील दुग्धविकास विभागाच्या जागेत स्थलांतरित करण्यास शासनाने बुधवारी मान्यता दिली आहे. दुग्धविकास विभागाच्या 2 हेक्‍टर जागेत स्थानक तीन वर्षांच्या कालावधीसाठी स्थलांतरण होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महामेट्रो या दोन्ही संस्थांनी वाकडेवाडी येथील दुग्धविकास विभागाच्या एकाच जागेची मागणी केली होती. मेट्रो प्रकल्प हा शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असल्याने दोन्ही प्राधिकरणांपैकी एकाची मागणी मान्य करण्याची बाब शासन स्तरावर विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने वाकडेवाडी येथील जागा पीएमआरडीए मेट्रोसाठी 4 हेक्‍टर इतकी जागा देण्याची मागणी अमान्य केली आहे. वाकडेवाडी येथील ही दोन हेक्‍टर जागा महामेट्रोला देण्याचा निर्णय घेतला आहे. ही जागा तात्पुरस्त्या स्वरुपात भाडेपट्ट्याने तीन वर्षांसाठी देण्यास शासनाने बुधवारी मान्यता दिली आहे.

दुग्ध विकास विभागाची जागा देताना शासनाने काही अटी व शर्ती घालून दिल्या आहेत. ज्या हेतूसाठी जागा मंजूर करण्यात आलेली आहे. त्याच हेतूसाठी या जागेचा वापर करणे बंधनकारक आहे. या जागेचे इतर कोणासही हस्तांतरण, फेरवाटप, पोटविभाजन करता येणार नाही. तसेच या जमिनीवर अन्य व्यक्ती अथवा संस्था आदींचे कोणत्याही प्रकारचे हक्क निर्माण होतील, अशा प्रकारे कोणताही आर्थिक व्यवहार करता येणार नाही. या जमिनीवरील दुग्धविकास विभागाची वापरात असलेली कार्यालये यांची पर्यायी व्यवस्था महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्यामार्फत करणे आवश्‍यक आहे. कालावधी संपल्यानंतर मुदतवाढीची आवश्‍यकता भासणार नाही, याकरिता महामेट्रो यांनी त्यांची कामे त्वरीत सुरू करून विहित कालमर्यादेत पूर्ण करून मुदत संपताच जमीन विभागास परत करणे आवश्‍यक राहणार असल्याचे शासनाने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)