शिवाजीनगर न्यायालयातील कामकाज ठप्प

न्यायालय सुरू 


मात्र, वकील, पक्षकर कामकाजात सहभागी झाले नाहीत

पुणे – मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात वकील सहभागी झाले आहेत. त्यामुळे गुरूवारी वकील कामकाजात हजर राहिले नाहीत. तर दुसरीकडे पक्षकारही न्यायालयात आले नाहीत. त्यामुळे सुट्टी नसतानाही गुरूवारी शिवाजीनगर न्यायालयाचे कामकाज ठप्प झाले होते.
केवळ उच्च न्यायालयाने आदेश दिल्यावरच सत्र न्यायालय बंद असते. गुरूवारी सत्र न्यायालय सुरू होते. मात्र, कामकाज होणार नाही, याबाबतची सुचना वकिलांनी पक्षकारांना यापूर्वीच दिली होती. त्यामुळे पक्षकार हजर राहिले नाहीत. काही वकील न्यायालयात हजर राहिले. मात्र, कामकाजात सहभागी झाले नाहीत. परिणामी, नेहमी गजबज असलेल्या शिवाजीनगर न्यायालयात शुकशुकाट दिसून आला. आज सुनावणी असलेल्या खटल्यात आपोआप पुढील तारिख पडणार आहे. वकिलांनी आंदोलन करून मराठा समाजास पाठींबा दिला आहे.
कौटुंबिक न्यायालयात देखील असेच चित्र होते. जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यातील न्यायालयात कामकाजात वकील सहभागी झाले नाहीत. दरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून पोलिसांच्या वतीने देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, येथे कोणताही गैरप्रकार झाला नाही, अशी माहिती न्यायालयातील चौकीचे पोलीस निरीक्षक प्रकाश शहा यांनी दिली.
पुणे जिल्हा बार असोसिएशच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे जावून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीस मराठा आरक्षणास पाठींबा असल्याचे सांगण्यात आले. तसेच आंदोलनात मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर दाखल असलेल्या केसेस मोफत लढल्या जाणार आहेत. ज्या आंदोलन कर्त्यांवर गुन्हे दाखल आहेत. त्या आंदोलनकर्त्यांनी याबाबतची माहिती पीबीएला द्यावी, असे आवाहन अध्यक्ष ऍड. सुभाष पवार यांनी केले. त्यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. भूपेंद्र गोसावी, ऍड. रेखा करंडे, सचिव ऍड. संतोष शितोळे, ऍड. लक्ष्मण घुले, खजिनदार ऍड. प्रताप मोरे, हिशेब तपासणीस ऍड. सुदाम मुरकुटे, ऍड. पांडुरंग थोरवे, ऍड. नितीन झंजाड यांच्यासह अनेक वकील उपस्थित होते.
फोटो संदीप स्मार्टला सोडणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)