शिवाजीनगर टपाल कार्यालयात वकिलांसाठी स्वतंत्र काऊंटर

– वकिलांच्या वेळेची होणार बचत : बार असो.चा पाठपुरावा

पुणे – वकिलांना अशिलांच्या प्रकरणात पाठवाव्या लागणाऱ्या नोटीस आणि रजिस्टर पोस्ट (आरपीडी) पाठविण्यासाठी टपाल कार्यालयात आता जास्तवेळ रांगेत थांबावे लागणार नाही. शिवाजीनगर येथील टपाल कार्यालयात वकिलांसाठी आता स्वतंत्र्य काऊंटर सुरू करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत हे काऊंटर सुरू राहणार आहे. या काऊंटरद्वारे एक वकिल कितीही टपाल पाठवू शकणार असल्याची माहिती, पुणे बार असोसिएशनचे (पीबीए) सचिव ऍड. संतोष शितोळे यांनी दिली.

याविषयी ऍड. शितोळे म्हणाले, “वकिलांचा वेळ वाचवा यासाठी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारातच टपाल खात्याचा एक काऊंटर देण्यात यावा, अशी मागणी असोसशिनकडून ऑक्‍टोबरमध्ये करण्यात आली होती. मात्र, शिवाजीनगरमध्ये टपालचे स्वतंत्र कार्यालय आहे. तर, पुणे महानगर पालिकेच्या इमारतीमध्ये सध्या अशी सुविधा देण्यात येते. त्यामुळे दोन जवळची ठिकाणे असताना न्यायालयात काऊंटर सुरू करता येणार नाही, असे स्पष्टीकरण टपाल खात्याकडून देण्यात आले होते. त्यामुळे न्यायालयाऐवजी शिवाजीनगर येथील टपालाच्या कार्यालयातची ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.’

वकिलांना अनेकांना नोटीस पाठवाव्या लागतात. तसेच रजिस्टर पोस्ट पाठविणाऱ्या वकिलांची संख्यादेखील मोठी आहे. हे सर्व टपाल सर्वाधिकपणे शिवाजीनगर टपाल कार्यालयातून पाठवली जातात. मात्र, ती जमा करीत असताना एका वकिलाने एका वेळी केवळ पाचच टपाल किंवा आरपीडी द्यावेत, असा नियम होता. त्यामुळे वकिलांना केवळ पाच टप्प्यात टपाल जमा करावे लागत आणि पाच पेक्षा जास्त टपाल असतील, तर पुन्हा रांगेत थाबून पुढील पत्रे जमा करावी लागत. त्यामुळे वकिलांचा मोठा वेळ त्यात जात. ही सर्व अडचण आता स्वतंत्र काऊंटरमुळे दूर होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)