शिवाजीनगरला एसटी गाड्या रोखल्या

नागठाणे – एसटी गाड्यांच्या अनियमितपणाच्या निषेधार्थ शिवाजीनगर (ता. सातारा) येथे विद्यार्थ्यांनी रास्ता रोखून धरला.
शिवाजीनगर, भाटमरळी, शेळकेवाडी येथील विद्यार्थी तसेच ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी शिवाजीनगर, आसनगाव, कुसवडे, कौंदणी येथून साताऱ्याला जाणाऱ्या एसटी गाड्या रोखून धरल्या.

एसटी गाड्या ठरलेल्या वेळेत येत नाहीत, परिसरात येणाऱ्या गाड्या नादुरूस्त असतात, वारंवार बिघडतात त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांचा खोळंबा होतो. वेळेचा अपव्यय होतो. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्याचा निषेध म्हणून या एसटी गाड्या रोखल्याचे यावेळी सांगण्यात आले. घटनेनंतर काही वेळाने एसटीचे अधिकारी आले. मात्र नियंत्रक जोपर्यंत येत नाहीत, तोपर्यंत गाड्या सोडणार नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यानंतर बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी घटनास्थळी आले. त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर गाड्या सोडण्यात आल्या. यावेळी विविध गावचे ग्रामपंचायत पदाधिकारीही उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)