शिवस्मारकाच्या बांधकामाचा प्रारंभ करण्यासाठी निघालेल्या स्पीड बोटीचा अपघात !

मुंबई: शिवस्मारकाच्या बांधकामाचा प्रारंभ करण्यासाठी निघालेल्या स्पीड बोटीचा अपघात झाला आहे. गिरगाव चौपाटीपासून ३ किमी अतंरावर दुपारी ४:१५ सुमारास हा अपघात झाला. या बोटीत 25 जण असल्याची माहिती मिळत आहे. स्पीड बोट खडकावर आदळल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्यासह कंत्राटदार, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी स्पीड बोटींनी अरबी समुद्रामध्ये निघाले. मात्र, त्यांच्यातील एक स्पीड बोट खडकावर आदळली आणि बोटीत अचानक पाणी शिरल्याने हाहाकार उडाला. तीनपैकी एका स्पीड बोटीमध्ये अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्ते होते. बोटीतील सर्वांना वाचविण्यात यश आल्याची माहिती मिळत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/ANI/status/1055072598340579328

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)