शिवस्मारकाचे काम ऑक्‍टोबरपासून सुरू होणार

विनायक मेटे : आगामी निवडणुकांत भाजपसोबतच राहणार

पुणे – मुंबई येथील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम सुरू झाल्याचे ऑक्‍टोबरपासून दिसेल, अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष व शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली.

शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेच्या मेळाव्याचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रभिनेत्री दीपाली भोसले-सय्यद यांसह इतर पक्षातील अनेक नेते व पदाधिकारी यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, नवनिर्वाचित युवक प्रदेशाध्यक्ष उदय आहेर, अविनाश खापे, माजी युवक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र म्हस्के, शैलेश सरकटे, प्रदेश सचिव शेखर पवार, जिल्हा संपर्क प्रमुख तुषार काकडे, शहराध्यक्ष भरत लगड, यांसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

मेटे म्हणाले, जे साथ देतील त्यांना सोबत घेऊन किंवा जे येणार नाहीत त्यांना रामराम करुन पक्ष वायू वेगाने वाढविण्याचे काम करायचे आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसंग्रमाचे किमान 5 ते 10 आमदार निवडून येतील, हा निश्‍चय आपण केला आहे. आपल्या पक्षात प्रस्थापित नेता किंवा घराणेशाही नाही. त्यामुळे विस्थापीत कार्यकर्ते घेऊन राजकीय व सामाजिक परिवर्तनाची लढाई आपल्याला करायची आहे. विभागलेल्यांची एकीची मूठ बांधण्याचे काम आपण करणार आहोत. लोकसभा व विधानसभा यांच्या निवडणुका एकत्रित होणार नाही. तसेच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच राहणार असल्याचेही मेटे यांनी सांगितले.

टिकणारा निर्णय घेऊ द्या
मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्गीय आयोगावर आपण जादा दबाव आणता कामा नये. त्यामुळे चुकीचा निर्णय किंवा अहवाल तयार होवू शकतो. यामुळे मराठा युवकांना चांगले भविष्य मिळणार नाही. आयोगाला अभ्यास करुन मगच टिकणारा निर्णय घेऊ द्या, असे आवाहन मेटे यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)