शिवसैनिक अयोध्येला रवाना

जिल्ह्यात आज होणार महाआरती

सातारा, दि. 23 (प्रतिनिधी)- निवडणूकीपुर्वी राम मंदिर झालेच पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे अयोध्येला रवाना झाले आहेत. त्यांना पाठींबा देण्यासाठी देशासह राज्याच्या आणि सातारा जिल्ह्यातून देखील शिवसैनिक अयोध्येला रवाना झाले असून रविवारी जिल्ह्यातील राममंदिरांमध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

-Ads-

सातारा तालुका व शहर शिवसेनेतर्फे दि.24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता श्रीराम मंदिर, प्रतापगंजपेठ राधिका चौक येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच बरोबर जिल्ह्यातील राम मंदिरांमध्ये महाआरती होणार आहे. तर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे अयोध्येती शरयू नदीकाठी शिवसैनिक व रामभक्तांच्या उपस्थितीत महाआरती करणार आहेत.

त्यानिमित्ताने साताऱ्यात महाआरती करण्यात येत असून त्यासाठी तालुका व शहरातील सर्व शिवसैनिक आजी माजी पदाधिकारी, हिंदू नागरिक युवा सेना महिला आघाडी, महाराष्ट्र वाहतूक सेना व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाआरतीसाठी मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन सातारा तालुका प्रमुख दत्तात्रय नलावडे, शहर प्रमुख निमिष शहा, शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)