‘शिवसेनेसोबत युती जरी झाली तरी गेल्या निवडणुकीपेक्षा एक जागा जास्तीची जिंकू !’

जालना: भाजप-शिवसेना युतीवरून चांगलीच राजकीय चर्चा रंगली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जागावाटपावरून शिवसेनेचा प्रस्ताव प्राप्त झाले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांनी तो मांडला नसून याबाबत अजून बैठकही झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

रावसाहेब दानवे जालन्यात बोलत होते. दानवे म्हणाले शिवसेना पक्षबरोबर युती जरी झाली तरी गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा एक जास्तीची जागा आम्ही जिंकू ! असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शिवसेना पक्षासोबत युती करण्यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नशील राहणार असल्याचे दानवे म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्रातील सगळ्या ४८ लोकसभा मतदारसंघात आमची तयारी पूर्ण झाली असून महाराष्ट्रात आमच्या विरोधात कोणीही एकत्र आले तरीही काही फरक पडणार नाही, असे त्यांनी बजावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)