शिवसेनेला महत्व देण्याची गरज नाही- एकनाथ खडसे

मुंबई : सेनेला आपण तेवढं महत्व देत नसून, ‘शिवसेनेच्या टीकेची दखल घ्यावीशी वाटत  नसल्याचे खडसे यांनी म्हंटले आहे. त्यांनी आधी सत्तेतून बाहेर पडावं आणि मग भाजपच्या लोकांवर टीका करावी.’ अशा शब्दात भाजप नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेनेनं ‘ आपल्या मुखपत्रातून त्यांच्यावर केलेल्या टिकेला उत्तर दिले आहे. ‘शिवसेनेची सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत नाही. त्यामुळे ते सत्तेत राहूनच भाजपवर टीका करत राहतील.’ असंही यावेळी खडसे म्हणाले.

दरम्यान  शिवसेनेने  आपल्या मुखपत्रातून भाजपा नेते एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला होता.  ‘एकनाथ खडसे यांना काँग्रेस- राष्ट्रवादीकडून खुली ऑफर आहे. मात्र पदर ढळल्यावर अशी ऑफर यायचीच. या जन्मातलं कर्माचं फळ याच जन्मात फेडायचं असतं’, अशी टिका शिवसेनेने केली होती दरम्यान या टीकेला उत्तर देताना,आपण शिवसेनेला महत्व देत नसल्याचे खडसे यांनी म्हंटले आहे.

-Ads-

.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)