शिवसेनेमुळे उड्डाणपूल रखडला- पंकजा मुंडे 

आ. शिवाजी कर्डिले दबंग आमदार; तेच चमत्कार करू शकतात 

नगर: शिवाजीराव कर्डीले हे दबंग आमदार आहेत. त्यांच्याकडे जादूची कांडी असून त्यांनी रात्रीतून कॉंग्रेसचे उमेदवार फोडले. भाजपमध्ये त्यांचा प्रवेश करून घेतला. हे चमत्कार फक्‍त कडीर्लेच करू शकतात. महापालिका झाल्यापासून सत्ताधाऱ्यांनी एकही भरीव काम नगरमध्ये केले नाही. मात्र विकास कामात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. शहरातील उड्डाणपुलाला भाजप सरकारने निधी दिला. पण, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी ना हरकत दाखला देण्यास टाळाटाळ केली. त्यांच्यामुळेच उड्डाणपूल रखडला असल्याचा आरोप प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

महापालिका निवडणुकांच्या प्रचारार्थ कायनेटिक चौकात आयोजित विजय संकल्प सभेत ना. मुंडे बोलत होत्या. यावेळी खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, अभय आगरकर उपस्थित होते. त्या म्हणाल्या की, सध्या प्रचाराचा झंझावत सुरू असून मध्य प्रदेश, तेलंगणातही मला प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, नगर येथेही मी प्रचारासाठीच आली आहे. त्यामुळे आता, मला प्रचारमंत्रीपदाच्रा दर्जा द्या, अशी विनंती मी आमच्या सुजितसिंग ठाकूर यांना करते. सध्या राज्यात कुठल्याही निवडणुका असल्या की पंकजा मुंडे या भाषणाला लागतात. सगळीकडे प्रचारासाठी मला पाठवले जाते.

उमेदवारही माझ्या सभांची पक्षाकडे मागणी करतात, नगर शहरातून बीड, पुणे, कल्याण, नाशिक , मनमाड, औरंगाबादला या भागातून जावे लागते. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर व्हावी यासाठी भाजपने या भागात उड्डाणपूल मंजूर केला. पण त्यासाठी महापालिका मंजुरी देण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई केली. त्यामुळे हा उड्डाणपूल रखडलेला आहे. गेली पंचवीस वषार्पासून नगर शहराचा विकास रखडलेला आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. नगरमध्ये भाजपची सत्ता आली तरच नगर शहराचा हा पूर्णपणे विकास होणार. भाजप विकासाचीच कामे करत नाही तर सामाजिक कामसुध्दा करते. त्यासाठी भाजप हा एकमेव पर्याय आहे. आ. कडीर्ले म्हणाले, केडगावमध्ये पंचवीस वर्षापासून कॉंग्रेसची सत्ता होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगीतले, तुमचे नाते गोते बाजूला ठेवा. नगरमध्ये भाजपची सत्ता आली पाहिजे. म्हणून कॉंग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना रात्रीतून मानसिकता बदलून भाजपमध्ये प्रवेश करुन घेतला व एबी फॉर्म दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)