शिवसेनेने स्वतःचा संसार नीट चालवावा- नवाब मलिक 

मुंबई: शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर असभ्य भाषेत टीका केली आहे. पण शिवसेनेचा भाजपसोबतचा मांडलेला संसार धड चालत नाही. अहमदनगरमध्ये ज्यांनी पक्षाचा आदेश पाळला नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईलच, पण शिवसेनेने भाजपासोबतचा संसार कसा नीट चालेल, हे आधी बघावे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. शिवसेनेचा भाजपसोबतचा संसार नीट चालेल की घटस्फोट होणार, याचंही उत्तर जनतेला हवे आहे, असंही मलिक म्हणालेत.

काय म्हणाले रामदास कदम ?

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“ज्यावेळी शिवसेना पक्षप्रमुखांनी एकला चलो रेची भूमिका घेतली होती, आम्हाला असं वाटलं होतं की,महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवार उभा करतील. आणि त्यानंतर सेनेचा उमेदवार असेल, या निवडणुकीत सेनेला जास्त मतं मिळतील असा अंदाज होता, आणि आणखी तीन नगरसेवक आमच्या संपर्कात होती. असे 28 मतं आमच्याकडे होती. त्यामुळे आमचा महापौर निवडून येईल असं आम्हाला वाटलं होतं. मात्र, राष्ट्रवादीने पुन्हा एकदा विरोधी पक्षाची भूमिका असताना ती बाजूला घेऊन सत्ताधारी भाजपचे मुके घेण्याचा काम केलं आहे. राष्ट्रवादीला भाजपविरोधात यापुढे निवडणूक लढवण्याचा अधिकार नाही, सेना सत्तेतून बाहेर का पडत नाही, याचं उत्तर अहमदनगर येथून मिळाले आहे.”

शिवसेनेने स्वतःचा संसार नीट चालतो का ते बघावे – नवाब मलिक

शिवसेनेने स्वतःचा संसार नीट चालतो का ते बघावे – Nawab Malikशिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर असभ्य भाषेत टीका केली आहे. पण शिवसेनेचा भाजपसोबतचा मांडलेला संसार धड चालत नाही. अहमदनगरमध्ये ज्यांनी पक्षाचा आदेश पाळला नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईलच, पण शिवसेनेने भाजपासोबतचा संसार कसा नीट चालेल, हे आधी बघावे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. शिवसेनेचा भाजपसोबतचा संसार नीट चालेल की घटस्फोट होणार, याचंही उत्तर जनतेला हवे आहे, असंही मलिक म्हणालेत.#Shivsena #BJP #फेकूसरकार

Posted by Nationalist Congress Party – NCP on Tuesday, 1 January 2019

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)