शिवसेनेने सुरू केली 2019 ची तयारी

वडगाव मावळ – आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या चर्चा गेल्या वर्षांपासून सुरू आहेत परंतु आता मात्र प्रत्यक्ष तयारी सुरू झाली आहे. मावळचा आपला किल्ला अभेद्य ठेवण्यासाठी शिवसेनेने देखील कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीस एक वर्षाहून कमी कालावधी उरला आहे. निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची फौज उभारण्याच्या दृष्टीने पदाधिकारी आणि प्रतिनिधींची नव्याने मोट बांधण्यासाठी पक्षाच्या वतीने एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या दृष्टीकोणातून खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या पुढाकाराने लोणावळा येथील एका रिसोर्टमध्ये शुक्रवारी एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्‌घाटन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या हस्ते होणार असून या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी पक्षातील प्रमुख वक्‍ते उपस्थित राहणार आहेत. या शिबिराचा समारोप जलसंपदा मंत्री विजयबापू शिवतारे यांच्या उपस्थितीत होणार आहे. शिबिरासाठी आमदार मनोहरशेठ भोईर, आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना विभागीय समन्वयक रविंद्र मिर्लेकर, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख बाळा कदम, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय मोरे , रायगड जिल्हा महिला संघटिका रेखा ठाकरे, रायगड जिल्हा महिला संपर्क प्रमुख किशोरी पेंडणेकर इ. मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेचे वक्‍ते शशांक मोहिते, दिपक शेडे, नितीन बानगुडे पाटील प्रमुख वक्‍ते राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)