शिवसेनेने राम कदमांची तुलना केली अल्लाउद्दीन खिलजीशी !

मुंबई – राज्यांतील महिलांविषयी अनुद्‌गार काढणारे भाजपचे आमदार राम कदम यांची तुलना शिवसेनेने अल्लाउद्दीन खिलजी याच्याशी केली आहे. आपल्या पक्षाच्या मुखपत्रातील अग्रलेखात शिवसेनेने म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रिपल तलाक रद्द करून देशातील मुस्लिम महिलांना न्याय देण्याची भाषा करतात पण महाराष्ट्रातील त्यांच्याच पक्षाचे एक आमदार राज्यातील महिलांमध्ये आपल्या वक्तव्याने भयाचे वातावरण निर्माण करीत आहेत.

राणी पद्मिनीने अल्लाउद्दीन खिलजीच्या विरोधात हजारो रजपूत महिलांसह जोहार करून स्वत:चा आणि धर्माचा सन्मान व प्रतिष्ठा कायम राखली. आता महाराष्ट्रातील भाजपच्या या खिलजीच्या विरोधात महाराष्ट्रातील महिलांनी एकत्रित लढा देण्याची गरज या अग्रलेखात व्यक्त करण्यात आली आहे.

राम कदम हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आमदार म्हणून परिचित असल्याचे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे. त्यांनी तुम्हाला कोणती मुलगी पाहिजे ते सांगा मी तुमच्यासाठी ती पळवून आणतो असे विधान करून महाराष्ट्रात कोणती हिणकस संस्कृती त्यांनी आणली आहे असा सवाल त्यात करण्यात आला आहे. महिला, शेतकरी, आणि सैनिकांच्या विधवांबद्दल अशी विधाने करणाऱ्या लोकांना भाजप पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यात करण्यात आला आहे.

अशा प्रवृत्तीच्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्य करण्याचा अधिकार नाही असेही यात नमूद करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)