शिवसेनेत अनेकांना आतापासून महापौरपदाचे वेध ; दुसऱ्याचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न 

आपला एकमेव पर्याय राहण्यासाठी दुसऱ्याचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न 

नगर: महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकणार असून महापौर देखील शिवसेनेचा होणार असल्याच्या वल्गना होवू लागल्याने आतापासून पक्षातील अनेकांना महापौरपदाचे वेध लागले आहेत. त्या तोऱ्यात ही मंडळी नगरसेवक पदाची उमेदवारी करीत असून महापौरपदासाठी आपला एकमेव पर्याय राहण्यासाठी व प्रतिस्पर्धी राहणार नाही, याची काळजी आतपासून घेण्यात येत असून प्रतिस्पर्धी निवडून येणार नाही, अशा पद्धतीने त्याचा पत्ताकट करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या शिवसेनेत अंतर्गत चांगलीच धुसफुस चालू झाली आहे.

-Ads-

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास गेल्या दोन दिवसांपासून सुरूवात झाली आहे. महापालिका निवडणुकीत सर्वच बाबतीमध्ये शिवसेनेने आघाडी घेतली आहे. फोडाफोडी, इच्छुकांच्या मुलाखती, उमेदवारांची यादी जाहीर करणे एवढेच नाही. प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी देखील सर्व राजकीय पक्षांपूर्वीच जाहीर करून निवडणूकीत सबसे बडा तेज शिवसेना हे दाखवून दिले आहे. सध्या तरी शिवसेनेने 32 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात विद्यमान नगरसेवकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. शिवसेनेकडून मातब्बर उमेदवार दिल्याने महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता येण्याचा दावा नेत्यांकडून केला आहे. त्याबरोबर पक्षाच्या वरिष्ठपातळीवरून महापालिका निवडणुकीकडे लक्ष दिले जात असल्याने सर्वच स्तरावर पक्षाकडून मदत होणार आहे. त्यामुळे सहाजिकच पक्षाचे बळ वाढले असून महापालिकेत शिवसेनेची सत्ता आता कोणत्याही परिस्थितीत येणार असल्याचे दिवास्वप्न नेत्यांना पडू लागले आहे.

शिवसेना महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असून सर्वच्या सर्व 68 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. त्या तुलनेत भाजपसह कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला उमेदवार मिळण्याची शक्‍य तशी कमी असल्याने शिवसेना सर्वाधिक जागा जिंकून महापालिकेत सत्ता स्थापन करेल असे शिवसेनेच्या नेत्यांना वाट आहे.त्यामुळे पक्षातंर्गत आतापासून महापौरपदाचा खेळ सुरू झाला आहे. महापौरपद सर्वसाधारण जागेसाठी राखीव असल्याने पक्षातील अनेक मातब्बरांनी त्यावर आता दावा सांगून आपल्याशिवाय आहे कोण असे म्हणून महापौरपदासाठी फिल्डिींग लावली आहे. अर्थात नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर महापौरपदाचा निर्णय होणार आहे. असे असले तरी नगरसेवक तर ती होणारच पण आता मला महापौर व्हायचं असे ठरवून हे मातब्बर कामाला लागले आहे. त्यामुळे महापौरपदाच्या आड येणाऱ्यांना पराभूत करण्याचा डाव खेळला जात आहे.

महापौरपदासाठी सध्या तरी शिवसेनेत सात ते आठ जण इच्छुक आहे. त्यातील बहुतांशी आपला महापौरपदासाठी प्रतिस्पर्धी राहणार नाही याची काळजी आता घेवू लागले आहे. त्यासाठी प्रतिस्पर्धाच्या प्रभागात विरोधकाला ताकद देण्याचे काम सुरू केले आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादीला जास्त होण्याची चिन्हे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या जागा वाढण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेत सत्ता येण्याचा विचारपेक्षा महापौरपदासाठी लढत आता होवू लागली आहे. त्यात शिवसेनेच्या काहींनी भाजपबरोबर संधान बांधले आहे. त्याचा फायदा कोणाला होणार हे निवडणूक निकालानंतर कळेल.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
1 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)