शिवसेनेच्या वतिने आपद्‌ग्रस्त कुटुबियांना मदत

सातारा, दि.1 – मुठा उजवा कालवा फुटून बाधित झालेल्या सुमारे चारशे नागरिकांना शिवसेनेच्या वतीने 5 किलो गहू आणि 5 किलो तांदूळाचे तसेच जीवनावश्‍यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले. ही माहिती कृष्णा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. नितीन बानुगडे-पाटील यांनी दिली.
ना.बानुगडे पाटील यांनी वाताहत झालेल्या कुटुंबियांना आवश्‍यक ती मदत करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार शिवसेनेच्या वतिने धान्य व ÷इतर जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप करण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले. पुणे येथील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी तातडीने कालवा फुटला त्याच रात्री बाधित कुटुंबियांना ही मदत केली. या वस्तीतील एका विद्यार्थ्याला प्रवेशासाठी सुमारे दिड लाख रुपयांचा निधी ही ना. बानुगडे-पाटील तसेच आ.निलम गोऱ्हे यांनी जमा करून दिला. दरम्यान पंचनामे व कालवाबाधितांची यादी अन्न व धान्य वितरण अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होताच आपत्तीग्रस्तांना दुसऱ्या दिवशी मोफत धान्य वाटप करण्यात आले. यावेळी अन्न धान्य वितरण अधिकरी अस्मिता मोरे, नायब तहसिलदार गीतांजली गरड-मुळीक, भीमशाही संघटनेचे अध्यक्ष राम पालखे राजश्री भंडारी आदी उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)