शिवसेनेच्या राजकीय देणग्यांमध्ये मोठी घट

मनसे, आप, जेडीएस यांना अच्छे दिन
नवी दिल्ली – देशातील प्रादेशिक राजकीय पक्षांना 2016-17 मध्ये मिळालेल्या देणग्यांची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म (एडीआर) या संस्थेने जाहीर केली आहे. या माहितीनुसार, प्रादेशिक पक्षांना 2015-17 या काळात मिळालेल्या देणग्यांच्या तुलनेत टॉप 5 पक्षांपैकी शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे की ज्याच्या देणग्यांमध्ये मोठी घट झाली आहे. यामध्ये 70 टक्के इतकी घट दिसून आली आहे.

राजकीय देणग्यांच्या या यादीनुसार, प्रादेशिक पक्षांना 20 हजार आणि त्यापेक्षा अधिक रकमेच्या रुपात एकूण 91.37 कोटी रुपये 6,339 देणग्यांमधून मिळाले आहेत. यामध्ये आम आदमी पार्टी, जेडीएस या पक्षांना चांगला निधी मिळाला आहे. या काळात शिवसेनेला 297 देणग्यांमधून 25.65 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. शिवसेनेच्या तुलनेत महाराष्ट्र निवनिर्माण सेनेच्या (मनसे) देणग्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या देणग्यांमधून मनसेला 1.4 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आम आदमी पक्षाला सर्वाधिक 3,865 देणग्या मिळाल्या असून यातून त्यांना 24.73 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आपने 8.82 कोटींचे दान परदेशातून प्राप्त झाले आहे. त्यानंतर शिरोमणी अकाली दल तिसऱ्या स्थानावर असून त्यांना 5842 देणग्या मिळाल्या आहेत. यातून पक्षाला 15.45 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. शिवसेना, आप आणि अकाली दल या तीन प्रादेशिक राजकीय पक्षांना एकूण देणग्यांपैकी 72.05 टक्के हिस्सा अर्थात 65.83 कोटी रुपये मिळाले आहेत.

यामध्ये आसाम गण परिषद (अगप) या प्रादेशिक राजकीय पक्षाच्या देणग्यांमध्ये सर्वोधिक वाढ झाली आहे. या पक्षाला रोख रकमेच्या स्वरुपात 41.2 लाख रुपये मिळाले आहेत. तर एकूण 43.7 लाख रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. तर कर्नाटकात कॉंग्रेससोबत सरकार स्थापन करणाऱ्या जनता दलच्या (सेक्‍युलर) देणग्यांमध्ये 596 ने वाढ झाली आहे. यातून जेडीएसला एकूण 4.2 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.

25 प्रादेशिक पक्षांपैकी 18 पक्षांनी विनापॅनच्या माहितीद्वारे या देणग्यांचा उल्लेख केला आहे. यामध्ये आरजेडी, बीपीएफ, एमजीपी, पीएमके आणि जेडीएनपीने आपल्या अहवालात देणग्या देणाऱ्यांची माहिती दिलेली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)