शिवसेनेच्या रणरागिणी संतापल्या

पिंपरी – तुम्हाला मुलगी पसंत असेल तर तिला पळवून आणायला मदत करेन, कधीही फोन करा, असे वक्तव्य करून महिलांचा अवमान करणारे भाजप आमदार राम कदम यांच्या प्रतिमेची शिवसेना महिला आघाडीने गाढवावरुन धिंड काढत त्याला जोडे मारले. त्यांच्या प्रतिमेचे तलवारीने हात कलम करण्यात आले.

दहीहंडी उत्सवात मुली – महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांचा राज्यभरातून निषेध केला जात आहे. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात शुक्रवारी (दि. 6) तीव्र निदर्शने करण्यात आली. राम कदम यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय, भाजप सरकार हाय हाय अशा जोरदार घोषणा देत राम कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. महिला आघाडीच्या रणरागिनींनी कदम यांच्या पुतळ्याला चपलांनी फटकावून निषेध केला. कदम यांचे बॅनर्स पायदळी तुडवले. भाजपने त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क संघटक वैशाली सुर्यवंशी, शहर संघटक सुलभा उबाळे, शहर प्रमुख योगेश बाबर यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात नगरसेविका अश्विनी चिंचवडे, मीनल यादव, सुशीला पवार, विजया जाधव, स्वरुपा खापेकर, प्रतीक्षा घुले, अनिता तुतारे, स्मिता जगदाळे, आशा भालेकर, शशिकला उभे, नगरसेवक सचिन भोसले, धनंजय आल्हाट, युवराज कोकाटे, रोमी संधू, संतोष सौंदणकर, भाविक देशमुख, वसंत भोसले, गजानन धावडे, विलास पवार, सर्जेराव भोसले, सोनू संधू आदी सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)