शिवसेनेच्या मुखपत्रातून अजित पवारांवर जहरी टीका

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यावर आज शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ मधून जहरी टीका करण्यात आली आहे. अजित पवार यांनी दसरा मेळाव्यामध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘अयोध्या वारीच्या’ घोषणेवरून एका जाहीर सभेत बोलताना येथेच्छ तोंड सुख घेतले होते. “यांना यांच्या बापाचे स्मारक पाच वर्षात बांधता आले नाही, तिथं अयोध्येत जाऊन काय करणार?” असा शाब्दिक मारा केला होता. पवारांच्या ‘या’ वक्तव्यानंतरच शिवसेनेकडून देखील ‘ठाकरी’ भाषेतच खरपूस समाचार घेतला जाण्याच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या.

आज शिवसेनेने ‘सामनाच्या’ अग्रलेखातून या शक्यता खऱ्या ठरवत अजित पवारांच्या शाब्दिक चकमकीला ‘ठाकरी’ भाषेत टोले दिले. सामनाच्या अग्रलेखातून अजित पवार यांच्या विवादित ‘धरण’ वक्तव्याचा उदोउदो करण्यात आला असून सिंचन घोट्याळ्याचे खापर देखील पवारांच्या माथी मारण्यात आले आहे. “अजित पवार आणि त्यांच्या टोळीने १५ वर्ष सरकारी तिजोरीची लूट केल्यानेच शेतकऱ्याच्या तोंडचा घास-पाणी पळालं आहे.” अशी टीका देखील त्यांच्यावर करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडाशी आल्या असतानाच महाराष्ट्रातील दोन महत्वाच्या ‘नेत्यांमध्ये’ पेटलेल्या या वादामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता सामनाच्या अग्रलेखाला पवार कसे प्रतिउत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)