शिवसेनेच्या ताब्यातील जागेवरून निवडणूक लढवण्यास आठवले उत्सुक

मुंबई – पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक लढवण्यास केंद्रीय मंत्री रामदास आठवले उत्सुक आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघाची निवड केली आहे. मात्र, ती जागा सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे.

आठवले यांनी वांद्रे येथील निवासस्थानी त्यांच्या नेतृत्वाखालील रिपाइंच्या (आठवले गट) पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. एवढेच नव्हे तर, निवडणुकीची तयारी सुरू करण्याचा आदेशही पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला. मात्र, आठवले यांच्या हालचालींमुळे शिवसेना नाराज होण्याची चिन्हे आहेत.

-Ads-

लोकसभेत सध्या मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेनेचे राहुल शेवाळे करत आहेत. आठवले यांना भाजपच्या कोट्यातून राज्यसभा सदस्यत्व आणि केंद्रीय मंत्रिपद मिळाले आहे. भाजप आणि शिवसेना हे पक्ष केंद्रात आणि राज्यात एकत्रितपणे सत्तेवर आहेत. मात्र, त्यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी शिवसेनेने याआधीच एकला चलो रेचा नारा दिला आहे. आता आठवले यांनी व्यक्त केलेल्या इच्छेबाबत शिवसेना काय भूमिका घेणार याविषयी उत्सुकता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)