शिवसेनेच्या गजानन कीर्तिकरांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल

सांगली  – सांगलीच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज पक्षाचे जेष्ठ नेते माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी जाहीर सभेत खरडपट्टी केली आहे.महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर बूथ संघटन वरुन कीर्तिकर यांनी स्थानिक नेत्याची चांगलीच कान उघडणी करत आम्ही दुधखुळे आहोत काय,आमची फसवणूक करताय काय असे खडे बोल सुनावले.तसेच जिल्हा प्रमुखाच्या हाकालपट्टीचा फर्मान भर  सभेत सोडला . यामुळे जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

सांगली महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर आज सांगली मध्ये शिवसेना जिल्हा मेळाव्याचे  आयोज़न करण्यात आले होते .या मेळाव्यासाठी शिवसेनेचे जेष्ठ नेते खासदार सुभाष देसाई ,माजी खासदार व पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख गजानन कीर्तिकर उपस्थित होते . या मेळाव्यात बोलताना माजी खासदार व पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख गजानन कीर्तिकर यांनी महापालिकेच्या बूथ प्रमुख निवडी वरून सांगली जिल्हा प्रमुखांचे जाहीर सभेतच वाभाडे काढले.

यावेळी कीर्तिकर यांनी जिल्ह्यातील सेनेच्या पदाधिकाऱ्यांची  भाषणा दरम्यान हजेरी घेण्यास सुरवात केली .यावेळी तालुकाप्रमुख  उपतालुकाप्रमुख ,बूथ कमिटी प्रमुख यांची संख्या पाहून संतापलेल्या कीर्तिकर यांनी जिल्हा प्रमुख संजय विभुते आणि आनंद पवार याना व्यासपीठावर बोलवता संघटना कशी चालावणार , शिवसेनचे तुम्ही सरदार आणि हाताखाली सैन्यचं  नाहीत तर लढाई कशी करणार असा सवाल करत,आम्ही काय दुधखुळे आहोत काय असे खडेबोल सुनावले. तसचे उद्धव ठाकरे या ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा करतात आणि तुम्ही काय करत आहात ? आमची फसवणूक करता आहात काय ? अशी दमबाजी करत दोघा जिल्हा प्रमुखांची हकालपट्टी करा असा आदेश यावेळी शिवसेना उपनेते व संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील यांना यावेळी दिला .तसेच गटप्रमुख निवडी वरुण पुन्हा मेळावा घ्या अशी सूचनाही यावेळी कीर्तिकर यांनी केली.सांगली महापालिकेच्या  निवडणुकीच्या तयारीसाठी घेण्यात आलेल्या मेळाव्यातून स्थानिक शिवसेना पक्षाचीच  तयारी नसल्याचे यानिमित्ताने  कीर्तिकर यांनी उघड केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)