शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखास मारहाण

नारायणगाव -अनोळखी व्यक्‍तीने रस्त्याने दुचाकीवर जाणाऱ्या शिवसेनेचे उपतालुका प्रमुख राजाराम कोंडाजी चव्हाण यांना थांबवून त्यांच्या तोंडावर मिरची पूड टाकून लोखंडी पाईप व दांडक्‍याने नाकावर, तोंडावर, पायावर मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना मौजे पिंपळगावच्या हद्दीत वाणी मळा येथील येणेरे -नारायणगाव रस्त्यावर घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 20) सायंकाळी 7.30 च्या सुमारास घडली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली. याप्रकरणी तीन अनोळखी व्यक्‍तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेनेचे उपतालुका प्रमुख राजाराम कोंडाजी चव्हाण (वय 40, धंदा शेती, रा. वडज, ता. जुन्नर) यांनी या घटनेबाबतची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे त्याचे गाव वडजहून येणरे- नारायणगाव रस्त्याने नारायणगाव येथे दुचाकीवर येत असताना रस्त्यावर उभा असलेले तीन अनोळखी व्यक्‍तींपैकी एकाने थांबण्याचा इशारा केल्याने फिर्यादी हे थांबले असता इशारा करणाऱ्याने तोंडावर मिरची पुड टाकली व त्यांच्या बरोबरच्या दोघांनी लोखंडी पाईपने व दांडक्‍याने नाकावर, तोंडावर, पायावर मारहाण करून आपखुशीने दुखापत केली. पोलिसांनी या घटनेची त्वरित नोंद घेऊन तीन अनोळखी व्यक्‍तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)