शिवसेनेच्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी

मुंबई – शिवसेनेचे भांडूपमधील आमदार अशोक पाटील यांना जीवे मारण्याची गुंडांकडून धमकी आली. या धमकीची पोलीस ठाण्यात तक्रारी करूनही दोन दिवस उलटले तरी पोलिसांकडून गंभीर दखल घेतली नसल्याबद्दल पाटील यांनी संताप व्यक्त केला. याप्रकरणी तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले जातील, असे आश्वासन गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिले.

विधानसभेत शिवसेनेचे आमदार अशोक पाटील यांनी माहितीचा मुद्दा उपस्थित करीत गुंडांकडून आलेल्या धमकीची माहिती दिली. गेल्या काही दिवसांत भांडुपमध्ये पाच हत्या झाल्या. विद्याथ्रयांना अमली पदार्थांच्या व्यसनात अडकवले जात आहे. मात्र पोलिसांचे यावर कोणतेही नियंत्रण नसताना आपल्यालाही अशाच गुंडांकडून दोन वेळा फोन करून जीवे मारण्याची धमकी गुंडांकडून येत आल्याचे त्यांनी सांगितले. या धमकीबद्दल शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी आमदारांच्या बाबतीत असा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो तर सर्वसामान्य नागरिकांचे काय, असा सवाल केला. त्याचप्रमाणे अशोक पाटील यांची सुरक्षा वाढविण्याची मागणी केली.

यावर बोलताना रजणजीत पाटील यांनी याप्रकरणी संबंधित पोलीस अधिकाछयांशी बोलून त्यांना सूचना करण्यात येईल. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले असून आमदारांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आल्याचे रणजीत पाटील म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)