शिवसेनेचे विचार घराघरात पोहचवा : बानगुडे-पाटील

सातारा- सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक शिवसेनाच करू शकते. शिवसेनेमध्ये युवकांच्या प्रवेशाचा ओघ वाढत असून संघटना व पक्ष अधिकाधिक बळकट करण्यासाठी शिवसेनेचे विचार घरा घरापर्यंत पोहचवा, असे आवाहन शिवसेना उपनेते व सातारा- सांगली जिल्हा संपर्क प्रमुख श्री नितीन बानगुडे पाटील यांनी केले.

तळीये ता.कोरेगाव येथील शिवसेना शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. त्यावेळी जिल्हाप्रमुख श्री चंद्रकांत जाधव, उत्तर कोरेगाव शिवसेना तालुका प्रमुख संतोष नाना सोळस्कर, सातारा जिल्हा वाहतूक सेना उपजिल्हा प्रमुख बाबूराव दाणे, संजय गांधी निऱाधार योजना सदस्य व फलटण तालुका प्रमुख श्री विठ्ठलराव गायकवाड, उत्तर कोरेगाव शिवसेना उपतालुका प्रमुख प्रशांत निकम संजय गांधी निराधार योजना कोरेगाव तालुका सदस्य अविनाश फडतरे, शिव सेना युवा नेते राजेंद्र शिंदे, श्रींकात निकम, प्रशांत तावरे वाठार विभाग प्रमुख सुमित चव्हाण, तळीये गावचे शाखा प्रमुख साहील मोरे, उप शाखा प्रमुख युवराज चव्हाण, बाबूराव मोरे, जेष्ठ नेते ऊत्तम काका नलवडे, वसंत धुमाऴ वाहतुक सेनेचे मोहनराव शिन्दे, बाबूराव पवार आदी. उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)