शिवसेनेचे महापालिकेत “ठिय्या आंदोलन’

पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदार संघातील गृहप्रकल्पांच्या पाण्यासाठी अचानकपणे सुरु केलेल्या “एनओसी’बाबत माहिती मिळेपर्यंत मुख्यालयातील सहशहर अभियंता कार्यालयात शिवसेना गटनेते राहुल कलाटे व मारुती भापकर यांनी शनिवारी (दि. 6) सायंकाळी ठिय्या आंदोलन सुरू केले. कार्यालयीन कामकाजानंतर सुरु झालेले हे आंदोलन माहिती मिळाल्याशिवाय मागे न घेण्यावर कलाटे व भापकर ठाम आहेत. त्यामुळे सहशहर अभियंता कार्यालय रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील चिंचवड विधानसभा मतदार संघात पाण्याची टंचाई जाणवत असल्याचे कारण पुढे करत, तीन महिन्यांपूर्वी याठिकाणच्या लहान बांधकामांना वगळून इतर सर्व बांधकामांना पाणी पुरवठ्यासाठी “एनओसी’ देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली होती. यावर मोठी टीका झाली होती. आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्यात चांगेलच शाब्दिक युद्ध रंगले होते. यामध्ये आरोपाच्या फैरी झडल्या होत्या. आमदार जगताप यांना पत्रकार परिषद घेत, याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतरही ही बंदी कायम होती.
दरम्यान, गुरुवारपासून (दि.4) पाणी पुरवठा विभागाच्या वतीने बांधकामांना पुन्हा “एनओसी’ देण्यास सुरुवात झाली. याची माहिती समजताच राहुल कलाटे यांनी प्रभारी सहशहर अभियंता रामदास तांबे यांच्या कार्यालयात जाऊन, याबाबतची लेखी माहिती देण्याची मागणी केली. तत्पूर्वी देखील हा निर्णय कोणत्या आधारे घेतला होता, याबाबत कलाटे यांनी तीन-चार वेळा मागणी करुनही पाणी पुरवठा विभागाकडून माहिती देण्यात आली नाही.

-Ads-

या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर, रामदास तांबे यांनी ही माहिती गोपनीय असून, ती आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिली असल्याचे सांगितले. ती माहिती आयुक्तांकडून घ्या, असे कलाटे यांना सांगितले. त्यामुळे संतापलेल्या कलाटे यांनी तांबे यांच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरु केले. आयुक्त हर्डीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतर, त्यांचा मोबाईल “स्वीच ऑफ’ लागत होता. त्यामुळे आयुक्त मुख्यालयात येईपर्यंत कार्यालयातून उठणार नसल्याची भुमिका घेतली. त्यामुळे तांबे यांची मोठी गोची झाली. रात्री नऊ वाजेपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरुच होते.

चिंचवड विधानसभा मतदार संघातील पाणी पुरवठ्याबाबत घेतलेल्या व पुन्हा बदलेल्या निर्णयाची माहिती घेण्यावर मी ठाम आहे. आयुक्त मुख्यालयात आल्याशिवाय सह शहर अभियंत्यांच्या कार्यालयातून बाहेर जाणार नाही.
– राहुल कलाटे, गटनेते, शिवसेना.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)