शिवसेनेचे मंचर माजी शहरप्रमुख भाजपमध्ये

मंचर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंचर शहर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख धनेश बाणखेले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भोसरी येथे भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री गिरीष बापट यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
भाजप पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये गणेश बाविस्कर, सुनिल गुप्ता, महेश मोरडे, महेश बाणखेले, अवधुत बाणखेले, मनोज लोंखडे, अक्षय चासकर, अनिकेत टेमगिरे, अब्दुल आतार, गुल्लु सय्यद, श्रीराम थोरात, दिलावर मीर, जससिंग घिसे, प्रसाद साळगावंकर, रिझवान शेख, सागर पिंगळे, संतोष जाधव, झहीर इनामदार, सलमान शेख, शुभम निघोट, भरत बाणखेले,, बब्बु मिर, मुदस्सर मिर यांच्यासह विविध मान्यवरांनी प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री गिरीष बापट, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, भाजपचे तालुकाप्रमुख जयसिंग एरंडे, सहकार आघाडीचे उपाध्यक्ष संजय थोरात, प्रमोद बाणखेले, संदीप बाणखेले, विजय पवार, रमेशकुमार हिंगे आदी मान्यवर उपस्थित होते. मंचर शहरातील शिवसेनेचे हे कार्यकर्ते भाजपमध्ये गेल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे मंचर शहरात भाजपची ताकद वाढण्यासाठी आपण प्रयत्न करू. असे युवानेते धनेश बाणखेले यांनी सांगितले. धनेश बाणखेले यांच्यासमावेत तालुक्‍यातील विविध गावचे युवक संघटनांचे पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांना पक्षात सन्मानाची वागणूक देऊन पक्षसंघटना वाढीसाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)