शिवसेनेचे नेते रहाणे अपघातात बचावले

दुचाकी चक्‍काचूर; धडक देणारे दुचाकीस्वार फरार

मंचर -आंबेगाव तालुक्‍यातील मंचर येथील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ऍड. अविनाश रहाणे हे मंचर येथे झालेल्या एका अपघातात नशीब बलवत्तर म्हणून बचावले. मात्र, या अपघातात रहाणे यांची दुचाकी चक्काचूर झाली आहे. अपघातात बचावलेल्या रहाणे यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख ऍड. अविनाश रहाणे हे दररोज सायंकाळी मंचर येथील क्रीडा संकुलामध्ये व्यायामासाठी जात असतात. गुरुवारी (दि. 29) क्रीडा संकुलातून घरी परतत असताना. पुणे-नाशिक महामार्गावरून सोनाई कॉम्पलेक्‍स समोरुन रहाणे यांनी दुचाकी लक्ष्मी रस्त्याकडे वळवली. तेव्हा समोरून आलेल्या दुचाकीने रहाणे यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, रहाणे यांची दुचाकी समोरून येणाऱ्या कंटेनरखाली सापडली. तर राहणे रस्त्याच्या विरुद्ध दिशेला पडल्यामुळे ते बचावले. या अपघातात त्यांच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली आहे.

अपघात घडल्यानंतर रहाणे यांच्या मदतीसाठी स्थानिक नागरिक धावून आले. त्यामुळे काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघातातील कंटेनर जागीच उभा राहिला होता तर धडक दिलेले दुचाकीस्वार पळून गेले होते. कंटेनर चालकांची कोणतीही चूक नसल्याने ऍड. अविनाश रहाणे यांनी माफ करून जाऊ दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)