शिवसेनेचे कातोरे यांच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी

मतदार यादीत बदल केल्याचा आरोप

नगर: महापालिकेच्या निवडणुकीत अवघ्या 84 मतांनी पराभूत झालेले शिवसेनेचे उमेदवार अक्षय कातोरे यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. कातोरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 11 जानेवारीला सुनावणी होणार आहे. विजयी आणि पराभूत, अशा 26 उमेदवारांना म्हणणे मांडण्यासाठी नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. जिल्हा न्यायाधीश ए. पी. कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कातोरे यांनी निवडणुकीतील गैरप्रकारामुळे आपण पराभूत झाल्याचे याचिकेत दावा केला आहे. ही निवडणूक रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी याचिकेद्वारे पुरावे सादर केले आहेत. कातोरे यांच्यातर्फे ऍड. नितीन आपटे हे युक्तिवाद करत आहेत. ऍड. अभिजीत लहारे व हेमंत पाटील हे मदत करत आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार कुमारसिंह वाकळे हे प्रभाग सातमधून निवडून आले आहेत.

प्रभाग सातमधील सुमारे 450 मतदार दुसऱ्या प्रभागात गेली आहे. बीएलओ यांना हाताशी धरून हा प्रकार करण्यात आला आहे. प्रारूप मतदार यादीवर हरकत घेऊन देखील प्रशासनाकडून त्यावर कार्यवाही झाली नाही. मयत मतदारांची देखील नावे यादीत आली आहेत. दुबार मतदार हे 250 च्यावर आहेत. अंतिम मतदार यादीत ऐनवेळी बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे मतदान प्रक्रियेत गोंधळ उडून त्याचा फायदा विरोधकांना झाल्याचा दावा कातोरे यांनी याचिकेद्वारे केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)