शिवसेनेची भूमिका शेतकरी विरोधी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रभाकर बांगर यांची टिका

मंचर- पाकिस्तानातून भारतात क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या खेळांडुंना शिवसेना विरोध करते; परंतु पाकिस्तानातून सरकारने आयात केलेल्या कांद्याला विरोध करीत नाही. याचा अर्थ शिवसेनेची भूमिका शेतकरी विरोधी आहे, अशी टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुकाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी केली आहे.
मंचर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कांद्याचे गडगडलेल्या बाजारभावाला कारणीभुत ठरलेल्या केंद्र सरकारचा कांदा फेकून दिला. तसेच शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा घालून सरकारचा निषेध केला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुकाध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. तसेच पुणे-नाशिक रस्त्यावर बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर कांदा ओतण्यात आला. यावेळी वनाजी बांगर, खेड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश परदेशी, काळुराम कड, यशवंत इंदोरे, गजानन बंगाळे पाटील, मोहन सावंत, नामदेव पोखरकर, आकाश दौंडकर, खंडू ताम्हाणे, महेंद्र लोखंडे, महेंद्र इंदोरे, संतोष तोत्रे, पंकज पोखरकर, सुनिल वाव्हळ, बाबाजी बांगर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)