शिवसेनेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

नगर – शिवसेनेची स्थापना होऊन 51 वर्षे झाली े. शिवसेनेने महाराष्ट्रा मध्ये अनेक पावसाळे आणि उन्हाळे पाहिलेले आहे.शिवसेनेने जो हिंदुत्वाचा विचार स्विकारला , त्याच्याशी कधीच फारकत घेतलेली नाही. म्हणुनच शिवसेना पक्ष आणि पक्षप्रमुखांकडे संपुर्ण देशच नव्हेतर जगआदराने पाहते. हिंदू ह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला किंमत होती. नगर शहरामध्ये गेल्या 30 वर्षापासुन शिवसेना उभी आहे. अनेक लोक या पक्षामध्ये आले गेले ,मात्र शिवसेना पक्ष हा आज एक वृक्षासारखा आहे व जो कधीच कोमजलेला नाही उलट त्याला अनेकदा पालवी फुटत गेली. अनेक शाखा निर्माण झाल्या आता हा वृक्ष बहरला आहे.शिवसेनेच्या माध्यमातून या नगर शहरात अनेक पदे सामान्याना मिळाली. राजकारणात सुध्दा वेगवेगळ्या समाजाच्या 3 व्यक्ती महापौर झाल्या आहेत. असे प्रतिपादन शिवसेनेचे उप नेते अनिल राठोड यांनी केले.

शिवसेनेच्या 51व्या वर्धापनदिना निमित्त शिवसेनेच्या वतीने नगर शहरात मानवी शिवसाखळीचे आयोजन करण्यात आले होते.त्याची सुरुवात शनी चौक येथील स्वामी विवेकानंद पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन झाली. सेनेचे सर्व नेते मंडळी ,सैनिक भगव्या टोप्या घालुन तसेच महिला आघाडी भगव्या साड्या परिधान करून उपस्थित होत्या.

या प्रसंगी शिवसेनेचे उपनेते अनिल भैय्या राठोड, महापौर सुरेखा कदम, शहर प्रमुख दिलिप सातपुते, उपजिल्हा प्रमुख भगवान फुलसौंदर, दिगंबर ढवण, म.न.पा. सभापती सचिन जाधव, सभागृह नेते अनिल शिंदे, युवासेना जिल्हा प्रमुख विक्रम राठोड, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक संजय शेंडगे, गणेश कवडे, डॉ.सागर बोरुडे, सुनिता फुलसौंदर, विद्या खैरे, उपशहर प्रमुख संतोष गेणप्पा, गणेश आष्टेकर, दत्ता मुदगल, नितीन बारस्कर, संतोष गायकवाड, बंडु क्षिरसागर, शशिकांत देशमुख, मंदार मुळे, भिंगार शहर प्रमुख सुनिल लालबोंद्रे, युवासेना शहर प्रमुख ऋषभ भंडारी, भिंगार शहर प्रमुख प्रतिक भंडारी, अभिषेक भोसले, एस.टी. कामगारसेना, शिक्षण सेना, महिला आगाडी, अशा निंबाळकर, अरुणा गोयल, सुजाता कदम, निर्मला धुपधरे, सुरेखा भोसले आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मानवी शिवसाखळी ची समाप्ती वीर सावरकर पुतळा चौपाटी कारंजा येथे झाली.

शहर प्रमुख दिलीप सातपुते म्हणाले कै.बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष हि महाराष्ट्राला दिलेली खुप मोठ देणगी आहे. महाराष्ट्राचे विविध प्रश्‍न शिवसेनेच्या विविध आंदोलनाच्या माध्यमातून मार्गी लागले. शिवसेनेने स्वातंत्र वीर सावकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती, त्यावेळी नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली होती. या पुढील काळातही सर्व शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी काम करणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)