शिवसेनेकडून रस्ते विभागाचे अधिकारी धारेवर

पाईप गळतीने वारंवार गैरसोय

उंब्रज – उंब्रज ता. कराड येथील सेवा रस्त्यातील गटारातून यशवंत कॉलनी येथून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन वेगळी करण्याच्या प्रश्नावर शिवसेनेचे सुनिल पाटील, संतोष बेडके यांच्यासह असंख्य पदाधिकारी, शिवसैनिक, ग्रामस्थ यांनी रस्ते देखभाल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरून रास्ता रोको आंदोलन केले.

-Ads-

यावेळी अधिकाऱ्यांनी 15 डिसेंबर अखेर काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. याबाबत माहिती अशी की, उंब्रज ता. कराड येथील सेवा रस्त्यावर असणाऱ्या यशवंत कॉलनीत जाणाऱ्या रोडजवळ पश्‍चिम बाजूकडून पूर्व बाजूला येणारी पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन सेवा रस्त्याच्या गटारातून नेण्यात आली आहे.

सदरच्या पाईपलाईनला 10 वर्षाहून अधिक काळ झाल्याने पाईपलाईनला वारंवार गळती लागण्याच्या घटना घडत आहेत. रहिवाशांना अनेक साथीच्या रोगाला सामोरे जावे लागले आहे. या होणाऱ्या वारंवारच्या गैरसोयीसाठी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गटारातून बाजूला करावी, अशी मागणी शिवसैनिकांनी रस्ते देखभाल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली.

यावेळी उपसरपंच पै. अजित जाधव यांनी कामासाठी लागणारी पाण्याची पाईप चार दिवसात उपलब्ध ग्रामपंचायतीच्या वतीने करून देण्यात येईल, असे सांगितले. यावर रस्ते देखभाल विभागाने वरीष्ठ विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत हे काम दि. 15 डिसेंबर अखेर पूर्ण करून देण्यात येईल असे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)