शिवसेनेकडून ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

 

चिंचवड – ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्त्य साधत, शिवसेनेच्या वतीने रविवारी(दि.30) ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा घेण्यात आला. चिंचवड येथील ऑटोक्‍लस्टर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, जिल्हा महिला संघटिका शादान चौधरी, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका ऍड. उर्मिला काळभोर, विधानसभा संघटक अनंत को-हाळे, प्रमोद कुटे, विधानसभा महिला संघटिका सरिता साने, अनिता तुतारे, नगरसेवक सचिन भोसले, नगरसेविका रेखा दर्शले, माजी नगरसेवक मधुकर बाबर, राम पात्रे, कामगार नेते जयसिंग पवार आदी उपस्थित होते.
यावेळी श्रीरंग बारणे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांकडे अनुभवाची शिदोरी आहे. तुमचे मार्गदर्शन पिंपरी चिंचवडसाठी मोलाचे आहे. शहरातील विरंगुळ केंद्र हे ज्येष्ठ नागरिकांसाठी सुख-दुःखाची देवाण घेवाण करण्याचे ठिकाण असुन वृद्धापकाळात अनेकांना मानसिक आधार हवा असतो. अशा वेळी शिवसेना तुमच्या बरोबर असेल. ज्येष्ठ नागरिकांनी भावनिक न होता कष्टाने कमवलेली आपली संपती कोणाच्या हाता मध्ये अथवा नावाने करू नये. आज परस्थिती बदली आहे. आई वडीलांना वृद्धाश्रमात टाकण्याची संख्या वाढत चालली आहे. ही समाजा साठी चिंतेची बाब असुन आपण दिलेले संस्कार कमी पडत नसुन पैश्‍याच्या मागे धावणारी प्रवृत्ती समाजात वाढत चालली आहे.प्रत्येक तरुण स्वत:चा विचार करू लागला आहे म्हणुनच आई वडीलांकडे लक्ष कमी होत असुन त्यातून वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते शहराच्या विविध भागातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार कऱण्यात आला. योगेश बाबर यांनी स्वागत केले तर जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, महिला संघटिका ऍड. उर्मिला काळभोर, माजी नगरसेवक मधुकर बाबर, कामगार नेते जयसिंग पवार यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संयोजन पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेने केले.
चिंचवड : शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करताना खासदार श्रीरंग बारणे. यावेळी मधुकर बाबर, शादान चौधरी, गजानन चिंचवडे, योगेश बाबर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)