शिवसेना शालेय विद्यार्थ्याना टॅब वाटप करणार

आमदार राजेश क्षीरसागर
कोल्हापूर – विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्याकरिता आधुनिक शिक्षणाकरिता शालेय विद्यार्थ्याना टॅब वाटप करण्याचा उपक्रम हाती घेणार, असे प्रतिपादन आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या स्थानिक विकास निधीतून कोल्हापूर शहरातील पाच शाळांना संगणक व प्रिंटरचे वाटप करण्यात आले. राजर्षी शाहू स्मारक भवन येते आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरजू 15 रुग्णांना मंजूर करण्यात आलेल्या रु.9 लाख 25 हजार इतक्‍या रक्कमेच्या निधी धनादेशाचे वितरणही याप्रसंगी करण्यात आले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुंबई मधील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासाठी टॅब वाटप केले, त्याच धर्तीवर पुढील काळात शहरातील विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्याकरिता आधुनिक शिक्षणाकरिता शालेय विद्यार्थ्याना टॅब वाटप करण्याचा उपक्रम हाती घेणार असल्याची ग्वाही देत पुढील महिन्यात युवासेनेच्या माध्यमातून श्रीसिद्धिविनायक ट्रस्टद्वारे शहरातील 11 वी ते 15 वीच्या विध्यार्थ्यांना मोफत पुस्तकाचे वाटप करण्याचा उपक्रमही राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)