शिवसेना, विहिंपच्या कार्यक्रमांपासून फारकत 

अखिल भारतीय आखाडा परिषदेने आमंत्रण फेटाळले

अलाहाबाद – साधू-संतांची सर्वात मोठी संस्था अखिल भारतीय आखाडा परिषदेने शिवसेना आणि विश्‍व हिंदू परिषदेचे आमंत्रण केवळ धुडकावलेच नाही तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर राजकीय खेळी केल्याचा गंभीर आरोपही केला आहे. आखाड्याशी संबंधित साधू-संत शिवसेनेच्याच नाही तर 25 नोव्हेंबर रोजी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमातही सहभागी होणार नाहीत, असे आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी स्पष्ट केले.

महंत नरेंद्र गिरी म्हणाले, या नेत्यांना रामापेक्षा राजकारणात अधिक रस आहे. या दोन्ही संघटना केवळ प्रचार करण्यासाठी आणि राजकारणासाठी अयोध्यात कार्यक्रम करत आहेत. जर हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदुत्वादी पक्षांचा मंदिर बनविणे हाच हेतू असेल, तर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन का? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. शिवसेना आणि विहिंपच्या कार्यक्रमांमुळे मंदिर बांधण्यासंदर्भात कोणताही तोडगा निघणार नाही, असेही ते म्हणाले.

आखाडा परिषदेची वेगळी बैठक 
शिवसेना आणि विहिंपच्या कार्यक्रमांपासून फारकत घेऊन आखाडा परिषद 4 आणि 5 डिसेंबर रोजी अयोध्येत वेगळी बैठक घेणार आहे. या बैठकीत अयोध्या प्रकरणातील पक्षकार इक्‍बाल अन्सारी यांसह अनके मुस्लीम धर्मगुरुंना आमंत्रण देण्यात आले आहे. जर राम मंदिराचे सर्व पक्षकार एकाच व्यासपीठावर आले तर परस्पर सहमतीने काहीतरी तोडगा नक्कीच निघेल, असे नरेंद्र गिरी यांनी सांगितले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)