शिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे

मुंबई : शिवसेना आणि भाजपमधील गेल्या साडे चार वर्षांतील वादानंतर आज पुन्हा एकदा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. युतीच्या निर्णयासाठी स्वतः भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी नव्या दिल्लीहून उपस्थिती लावली असून उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्री येथे पार पडलेल्या मॅराथॉन बैठकीनंतर ब्ल्यू-नाईल हॉटेल येथे पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-भाजपच्या युतीबाबत पुढील मुद्दे मांडले आहेत.

१) शिवसेना आणि भाजप युतीबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी विचारांचे असल्यामुळे पुन्हा एकदा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे, असं सांगितलं. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्र हिताचे काम करणारे पक्ष एकत्र येण्याची गरज असल्याने लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र लढवणार असल्याचं देखील त्र्यांनी सांगितलं.
२) या युतीमधून शिवसेना आणि भाजप सामान्य माणूस, शेतकऱ्यांचे हित जोपासणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितले.
३)अयोध्येतील राम मंदिरासाठी शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष आग्रही आहेत अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
४) तांत्रिक कारणांमुळे शेतकरी कर्जमाफीपासून दूर राहिलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न उद्धवजींनी प्रकर्षाने मांडला असून त्यावर आवश्यक ती पावले उचलली जातील असं आश्वासन मुखमंत्र्यांनी दिल.
५) पीक विम्याच्या संदर्भात तक्रारींसाठी खास यंत्रणा उभारणार असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेने उचलून धरलेल्या पीक विमा योजनेतील घोटाळ्याचा मुद्दा निकालात काढला.
६) शिवसेनेने प्रखर विरोध केलेला नानार प्रकल्प हलवणार असल्याचे सांगत भाजप युतीसाठी बॅकफूटवर उतरले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले.
७) लोकसभेमध्ये शिवसेना २३ तर भारतीय जनता पक्ष २५ जागांवर निवडणूक लढवेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
८) विधानसभेत मित्रपक्षांच्या जागा सोडून इतर जागांवर शिवसेना भाजप निम्म्या निम्म्या जागांवर निवडणूक लढवेल असं देखील मुख्यमंत्री म्हणाले.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)