शिवसेना-भाजपाची प्रत्येकी दोन जागांवर बाजी

विधानपरिषद निवडणूक : राष्ट्रवादी कॉंग्रेसने रायगड राखले, कॉंग्रेसला धक्का


विधानपरिषदेतील संख्याबळ वाढविण्यात शिवसेनेला यश

मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या विधानपरिषदेच्या 6 पैकी 5 जागांचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये शिवसेनेने 2, भाजपने 2 आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने एका जागेवर बाजी मारली आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसला आपले खाते उघडता आलेले नाही. तर लातूर-बीड-उस्मानाबाद या मतदारसंघाचा निकाल हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने राखून ठेवल्याने या जागेची मतमोजणी लांबणीवर पडली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थामधून विधानपरिषदेवर पाठवून देण्यासाठी रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, परभणी-हिंगोली, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या मतदारसंघात 21 मे रोजी निवडणूक झाली होती. या निवडणूकांचा आज निकाल जाहिर करण्यात आला. हा निकाल कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी धक्कादायक होता.

अमरावतीत कॉंग्रेसला जबर धक्का मिळाला. कारण अमरावतीत कॉंग्रेसची स्वत:ची 128 मतं असताना कॉंग्रेस उमेदवाराला केवळ 17 मते मिळाली. त्यामुळे भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे 458 मतांनी विजयी झाले. यावरून कॉंग्रेसने भाजपाला मतदान केल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे या निवडणूकीत शिवसेनेने दोन जागा पटकावत विधानपरिषदेतील आपले संख्याबळ वाढविण्यात यशस्वी झाली आहे. परभणी-हिंगोली मतदारसंघात शिवसेनेच्या विप्लव बाजोरिया यांनी विजय मिळवला. त्यांना 256 मतं मिळाली. तर कॉंग्रेसचे पराभूत उमेदवार सुरेश देशमुख यांच्या पदरात 221 मतं पडली.

परभणी-हिंगोली बरोबरच शिवसेनेने नाशिकमध्ये शिवसेनेने बाजी मारली. पालघरचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा देणाऱ्या भाजपला हा मोठा दणका आहे. शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी जवळपास 200 मतांनी विजय मिळवला. दराडेंना 412 मतं तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवाजी सहाणे यांना 219 मतं मिळाली.

कॉंग्रेसला एकही जागा मिळवता आली नसली तरी आघाडीतला पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसने रायगड राखला आहे. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे सुपूत्र अनिकेत तटकरे यांनी शिवसेनेचा पराभव करीत विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या राजीव साबळे यांचा पराभव केला. तटकरेंना तब्बल 620, तर साबळेंना 306 मतं मिळाली.
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या जागेवर भाजपच्या रामदास आंबटकर यांनी विजय मिळवला. रामदास आंबटकर यांना 528 मतं मिळाली. तर कॉंग्रेसच्या इंद्रकुमार सराफ हे 491 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)